मसाले खराब झाले आहेत की नाही कसे ओळखायचे. पाहा अगदी सोपे आहे.
खडे मसाले घरात ठेवलेले असतात. वर्षानुवर्षे हे मसाले टिकतात. त्यांची फार काळजी वगैरे आपण घेत नाही.
मात्र घरात पडून राहिलेले हे मसाले खराब होतच नाहीत असे नाही. ते जरी दिर्घकाळ टिकणारे असले तरी हवामान आणि पाण्यामुळे ते खराब होऊ शकतात.
मसाले खराब झाले आहेत की नाही हे पटकन ओळखता येत नाही. या काही टिप्स लक्षात ठेवा. खराब मसाले ओळखा.
जर मसाला खराब झाला असेल तर मसाल्याचा रंग फिका पडतो. रंगावरुन ओळखता येते.
रंगासारखेच वासही महत्त्वाचा हसतो. मसाल्यांचा वास जर चांगला आणि भरपूर येत नसेल तर ते वापरण्यात काही अर्थ नाही.
खड्या मसाल्यांचा आकार बदलतो. मऊ पडतात. मऊ झाल्यावर ते पदार्थ वापरु नयेत.
मसाल्याची चव तीव्र किंवा खमंग लागत नसेल तर ते मसाले वापरु नका. पदार्थांची चव वाढण्याऐवजी खराब होऊ शकते.
मसाले जरी दिर्घकाळ टिकणारे असले तरी अतिकाळासाठी साठवून ठेवायचे नाहीत. काही ठराविक कालावधीसाठी साठवावेत.