उष्णतेमुळे पोटात जळजळ, आग होत असेल तर...

उन्हाळ्यात खूप लोकांना हा त्रास होतो. पोटात, छातीत नेहमीच जळजळ होते. 

असं झाल्यास कुठला घरगुती उपाय करता येऊ शकतो, ते पाहूया...

शतावरी आणि शंख भस्म दोन्हीही समप्रमाणात एकत्र करून घेतल्यास पोटातली जळजळ कमी होण्यास निश्चित मदत होते.

ज्येष्ठमध आणि खडीसाखर हे पदार्थही पोटाला थंडावा देतात.

त्यासाठी खडीसाखर घालून दूध उकळून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये ज्येष्ठमध घालून ते काेमट करून प्यावे. 

उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळायला हवे. त्याऐवजी हलका आहार घ्यावा आणि जेवणानंतर शतपावली अवश्य करावी.

Click Here