पावसाळ्यात केसांमधून येणारा कुबट वास घालविण्यासाठी ५ उपाय

पावसाळ्याच्या दिवसांत अनेक जणींना हा त्रास खूप जाणवतो. केसांमधून खूप घाण, कुबट वास येतो.

हा वास घालविण्यासाठी काय नैसर्गिक उपाय करता येऊ शकतात ते आता पाहुया..

पुदिन्याची मुठभर पानं मिक्सरमधून वाटून घ्या आणि दोन चमचे दह्यामध्ये एकत्र करा. हा लेप केसांना लावल्याने केसांची दुर्गंधी कमी होते.

दही आणि दालचिनी एकत्र करून केसांच्या मुळाशी लावणेही फायदेशीर ठरते.

केसांमधून येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी व्हिनेगरही उपयुक्त ठरते. त्यामुळे केसांमधील कोंडाही कमी होतो.

कोरफडीमध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मही डोक्यामधील दुर्गंधी कमी करण्यासाठी मदत करतात.

लिंबाचा रस आणि दही एकत्र करून लावल्यानेही केसांमधला कोंडा आणि दुर्गंधी दोन्ही कमी होते. 

Click Here