साबणाऐवजी चेहऱ्याला 'हे' लावा, मिळेल मस्त ग्लो..

छान चमकदार, सुंदर त्वचा हवी असेल तर हे काही उपाय करून पाहा..

साबण किंवा फेसवॉशऐवजी तुम्ही पुढे सांगितलेले काही पदार्थ वापरले तर नक्कीच त्याचा त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. 

त्यापैकी एक आहे बेसन. बेसन त्वचेला पोषण तर देतेच, पण त्यासोबतच त्वचेवरची घाणही काढून टाकण्यास मदत करते.

बेसनामध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करतात. 

बेसनामुळे टॅनिंग, डेडस्किन निघून जाते आणि त्वचा छान मऊ, कोमल, उजळ दिसतेे.

बेसन आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्याला लावा. हा एक उत्तम फेसमास्क आहे..

ज्यांनी त्वचा कोरडी आहे, त्यांनी या फेसमास्कमध्ये थोडं ग्लिसरिन किंवा खोबरेल तेल घालावं. त्वचेवर छान इफेक्ट दिसून येईल. 

Click Here