दातांची काळजी घेताना ते घासायची पद्धतही लक्षात ठेवा. चुकीच्या पद्धतीने दात नका घासू.
दात चुकीच्या पद्धतीने घासल्यामुळे ते हवे तसे स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे ते हळूहळू किडायला लागतात आणि दात घासले तरी तोंडाला वास येतो.
दात घासताना किमान दोन मिनिटे तरी दात घासा. काही जणांचे दात घासून चुळ भरुन सारे काही दोन मिनिटांत होते. तसे न करता दातावर ब्रश फिरवण्याची क्रिया किमान दोन ते तीन मिनिटे करा.
दात घासताना ब्रश गोलाकार फिरवणे गरजेचे असते. आपण ब्रश फक्त वरखाली फिरवतो. त्यामुळे दातांवरील डाग आणि किटाणू जात नाहीत.
दातांच्या मागच्या बाजूनेही ब्रश फिरवा. हात वाकडा करुन आतील बाजूही साफ करा. अनेकदा तसे न केल्यामुळे आतून दात खराब होतात.
दात घासताना जीभ आणि मागचे दात राहून जातात. मात्र तसे न करता व्यवस्थित मागपर्यंत ब्रश जाईल याची काळजी घ्यायची. तसेच जीभही साफ करायची.
सकाळी दात घासायचे आणि रात्रीही घासायचे. दिवसातून दोनदा दात घासल्यावर दातांचे आरोग्य चांगले राहते.
काही जणं अगदी जोरात दात घासतात. मात्र त्यामुळे हिरड्यांना दुखापत होते. दात घासताना हळू घासा. जास्त जोर लाऊ नका.