मुलांना जेवणाच्या सवयी व्यवस्थित नसतील तर पालकांनी त्यांचं वर्तन एकदा तपासून पाहायला हवं.
कारण मुलं पालकांकडे पाहूनच शिकतात. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या बाबतीतही पालकांचं अनुकरण करतात.
बऱ्याचदा लहान समजून पालकच मुलांना भाजी, पोळी, वरण, भात, सलाड असं पुर्ण ताट वाढून देत नाहीत.
यामुळे मुलांना एकच एक पदार्थ खाण्याची सवय लागते. सगळे पदार्थ ताटात घेऊन ते व्यवस्थित जेवत नाहीत.
मुलांना हे चालणार नाही, ते चालणार नाही, असं म्हणूनच पालकच कित्येकदा मुलांचा आहार ठरवतात. हे टाळायला हवं.
मुलांना प्रत्येक पदार्थ चाखून पाहायची सवय लावा. त्यातूनच त्यांना वेगवेगळ्या चवी कळायला लागतात.चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ, जंकफूड देण्याचा दिवस ठरवून ठेवा. त्याआधी त्यांना मुळीच देऊ नका.