केस गळणं थांबवायचं असेल तर पुढे सांगितलेला उपाय लगेचच करून पाहा..
हा उपाय केल्याने केस गळणं तर कमी होईलच. पण केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढही चांगली होईल.
हा घरगुती हेअरमास्क तयार करण्यासाठी आपल्याला कोरफड आणि दही लागणार आहे.
कोरफडीचा ताजा गर काढून घ्या. कोरफडीमुळे केस गळणं कमी होतं आणि केसांवर चमक येते. केसांचा कोरडेपणा कमी होतो.
दह्यामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. तसेच डोक्यातला कोंडाही कमी होतो.
हा मास्क अर्धा ते पाऊण तास केसांवर लावून ठेवा आणि त्यानंतर माईल्ड शाम्पू वापरून केस धुवा. केसांची चांगली वाढ होईल.