डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली असतील तर ती कमी करण्यासाठी काय उपाय करावा ते पाहुया...
डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची कित्येक वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाढलेला स्क्रिन टाईम.
डोळ्यांसमोर सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही असल्याने त्याचा वाईट परिणाम डोळ्यांवर होतो. डार्क सर्कल्सही वाढतात.
डोळे सतत चोळण्याची सवय असेल तर त्यामुळेही डार्क सर्कल्स वाढत जातात. ती कमी कशी करायची ते पाहुया..
यासाठी कॉफी पावडर, चिमूटभर हळद एका वाटीमध्ये घ्या.
त्यामध्ये थोडं कच्चं दूध आणि मध घाला. हे सगळे पदार्थ एकत्र करून डोळ्यांभोवती लावा.
१० मिनिटांनी चेहरा धुूवून टाका. डार्क सर्कल्स कमी होण्यास निश्चितच मदत होईल.