कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलेली घाण कशी स्वच्छ करावी?

कुकरची शिट्टी स्वच्छ करण्यासाठी हे काही घरगुती उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

कुकरची शिट्टी व्यवस्थित स्वच्छ असणं गरजेचं आहे. तरच तिच्यातून वाफ व्यवस्थित बाहेर पडते आणि कुकरचं लाईफ वाढतं.

बेकिंग सोडा वापरून कुकरची शिट्टी स्वच्छ करता येते. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी यांचं मिश्रण तयार करा.

यामध्ये १० ते १५ मिनिटांसाठी कुकरची शिट्टी भिजत ठेवा आणि नंतर ती एखाद्या टुथब्रशने घासून घ्या.

लिंबू अर्धे कापून घ्या. त्यावर मीठ लावा आणि आता लिंबू आणि मीठ हे मिश्रण कुकरच्या शिट्टीवर घासून ती स्वच्छ करा.

व्हिनेगर आणि पाणी यांच्या मिश्रणानेही कुकरची शिट्टी स्वच्छ करता येते.

व्हिनेगर, पाणी या मिश्रणात कुकरची शिट्टी १० मिनिटांसाठी भिजत ठेवा आणि त्यानंतर ती स्वच्छ घासून घ्या. 

Click Here