घरात केलेले काही छोटे छोटे बदलही आपल्या घरात खूप सकारात्मक उर्जा घेऊन येतात.
घरात पॉझिटीव्ह एनर्जी राहण्यासाठी घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे अजिबात पसारा, कचरा ठेवू नका.
घराचे दारं, खिडक्या, पडदे उघडे ठेवा. भरपूर सुर्यप्रकाश घरात आला की फ्रेश वाटतं.
घरात इनडोअर प्लांट्स ठेवल्यानेही खूप प्रसन्न आणि पॉझिटीव्ह वाटतं. घराच्या सौंदर्यातही भर पडते.
घरातले आरसे नेहमी अशा ठिकाणी ठेवावे जिथून त्यांच्यावर थेट सुर्यप्रकाश पडेल आणि तो त्या खोलीमध्ये रिफ्लेक्ट होईल.
घरातले फर्निचर खूप बोजड, गडद रंगाचे नको. मुव्हेबल फर्निचर घेण्यास प्राधान्य द्या. गरजेनुसार ते हलवून घराला वेगवेगळा लूक द्या.
सकाळी, संध्याकाळी घरात जर मंद सुगंध दरवळत राहिला तरीही घरात खूप फ्रेश वाटते.