उन्हाळ्यातल्या या समस्येवर बघा काही सोपे घरगुती उपाय
उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की घामोळ्या येणं, सनबर्न होणं असा त्रास खूप जणांना होतो.
घामोळ्यांना तर खूप खाज येते. त्या भागात खूप आग होते. अशावेळी काय करावं सुचत नाही.
म्हणूनच हा एक सोपा उपाय पाहा. घामोळ्या आलेल्या ठिकाणी कोरफडीचा ताजा गर लावा. थंड वाटेल.
घामोळ्या किंवा सनबर्न झालं असल्यास त्या भागात थोडा चंदनाचा लेप लावा. लवकर बरं वाटेल.
बेकिंग सोड्यामध्ये पाणी घाला आणि त्याचा लेप घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावा. १० मिनिटांनी धुवून टाका.