स्ट्रीटफूड पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. पण त्याचवेळी वजन वाढण्याचं टेन्शन येतं..
म्हणूनच आता असं होऊ देऊ नका. कारण आपल्याकडे मिळणाऱ्या स्ट्रीटफूडपैकी काही पदार्थ असेही आहेत जे हेल्दी असतात.
त्यातलं पहिलं आहे भाजलेले किंवा उकडलेले मक्याचे कणिस.. ते खाण्याचा मोह झाला तर अजिबात टाळू नका.
फ्रुट चाट किंवा फ्रुट प्लेट हा देखील एक आरोग्यदायीच पदार्थ आहे.
मुरमुऱ्यांची भेळही तुम्ही खाऊ शकता. कारण वजन वाढण्यासारखं त्यात काहीच नाही.
चौथा पदार्थ आहे चना चाट. हा पदार्थही अतिशय लोकप्रिय असून आपल्याकडे तो आवडीने खाल्ला जातो.
इडली हा देखील एक पौष्टिक पदार्थच आहे. पण इडली खाताना तिच्यासोबत सांबार किंवा चटणी मात्र भरपूर खा.