सोयाबिनची चव आवडत नसेल तर नक्की आवडायला लागेल. हे पदार्थ करुन पाहा.
सोयाबिन हा पदार्थ डाएट करणाऱ्यासाठी एकदम मस्त आहे. आहारात सोयाबिन असावे. पण सगळ्यांनाच त्याची चव आवडत नाही.
ज्यांना सोयाबिन आवडत नाही त्यांच्यासाठी खास काही पदार्थ आहेत. ते नक्की करुन पाहा. चवीला एकदम भारी असतात.
सोयाचिली हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. करायलाही अगदी सोपा. डेसी चायनिज आवडत असेल तर नक्की खा.
सोयाबिनचा उपमा केला जातो. पौष्टिक खायचे असेल तर हा पदार्थ अगदी योग्य आहे. पटकन होतो आणि छान लागतो.
सोयाबिनचे कटलेट करता येतात. भाज्या घालून करायचे. त्यात मसाले घालायचे म्हणजे चव छान येते.
सोयाबिनचे सॅलेड करता येते. भिजवलेले सोयबिन थोड्या तेलावर परतायचे. आणि त्यात भाज्या घालायच्या. पौष्टिक पदार्थ आहे.
सोयाबिन पुलाव एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे. भाताचा पौष्टिक प्रकार आहे. नक्की करुन पाहा.
सोयाबिन पराठा नाश्त्यासाठी डब्यासाठी करता येतो. पोटभरीचा पदार्थ आहे.