हरितालिका उपवास: ड्रायफ्रुट्स मिल्कशेक रेसिपी, दिवसभर एनर्जी टिकेल 

हरितालिकेच्या उपवासासाठी ड्रायफ्रुट्स मिल्क शेक रेसिपी

हरितालिकेचं व्रत कित्येक महिला करतात आणि त्यादिवशी उपवास करतात.

उपवासामुळे कित्येकजणींना दुपारनंतर थकवा यायला लागतो. संध्याकाळनंतर गळून गेल्यासारखं वाटतं.

हा त्रास होऊ नये म्हणून उपवासाच्या दिवशी सकाळी ड्रायफ्रुट मिल्कशेक करून प्या. दिवसभर एनर्जी टिकून राहील.

त्यासाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असं सगळं समप्रमाणात घेऊन एक तास दुधामध्ये भिजत घाला.

१ अंजीर आणि १ खजूरही दुधामध्ये भिजत घाला. यामुळे त्या मिल्कशेकमध्ये साखर, गूळ असं काहीही टाकण्याची गरज नसते. 

त्यानंतर भिजवलेला सगळा सुकामेवा मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. 

त्यात दूध घाला. ड्रायफ्रुट मिल्कशेक झाला तयार. 

Click Here