आहारात असावेत हे काही पदार्थ आरोग्यासाठीच नाही तर मेंदूसाठीही फार उपयुक्त.
मेंदूच्या आरोग्यासाठी आहारात फक्त बदाम असून चालत नाही. इतरही पदार्थ असणे गरजेचे असते.
आहारात या काही पदार्थांचा समावेश असणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते. इतरही शारीरिक फायदे मिळतात.
पालकाची भाजी मेंदूसाठी फार फायद्याची ठरते. पालेभाज्या आरोग्यासाठी फार चांगल्या असतात. त्यात अनेक जीवनसत्वे असतात.
जीवनसत्त्व 'सी' मेंदूसाठी फार गरजेचे असते. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्व 'सी' भरपूर असते. तसेच अॅण्टी ऑक्सिडंट्स आणि इतरही अनेक गुणधर्म असतात.
बीट रक्त वाढवण्यासाठी गरजेचे असते. हे तर आपल्याला माहिती आहे मात्र बीट खाल्याने मेंदूलाही चालना मिळते. ब्रेनसेल्ससाठी बीट चांगले असते.
मेंदूसाठी गाजर एकदम मस्त आहे. डोळ्यासाठी ते जेवढे फायद्याचे आहे तेवढेच मेंदूसाठीही आहे. आहारात गाजर असणे स्मरणशक्तीसाठी फार उपयुक्त ठरते.
सुकामेवा आणि बौद्धिक क्षमतेचे नाते तर आपल्याला माहितीच आहे. सुकामेवा फार पौष्टिक असतो. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य चांगले राहावे यासाठी सुकामेवा खावा.
आणखी एक उपयुक्त भाजी म्हणजे रंगीत भोपळी मिरची ज्याला बेल पेपर्स असे म्हटले जाते. ही भाजी मेंदू तल्लख ठेवण्यासाठी फायद्याची ठरते.