वेळेवर पाळी येत नसेल तर आहारात घ्या हे पदार्थ. आरोग्यसाठी नक्कीच चांगले.
आजकालच्या मुलींची दिनचर्या आणि बदललेली लाईफस्टाईल यामुळे पाळी वेळेवर येत नाही. PCOD आणि PCOS सारखे त्रास नसतानाही पाळी वेळेवर येत नाही.
पाळी वेळेवर यावी यासाठी काही उपाय आपण करतो. पण फक्त पाळी जवळ आल्यावर असे उपाय करण्यापेक्षा आहारात काही पदार्थ नियमित घेतल्याने पाळीची समस्या कमी होते.
खजूर पाळी यावी यासाठी अनेक महिला खातात. मात्र असे भरपूर खजूर कधीतरी खाण्यापेक्षा आहारात त्याचा समावेश करा. खजूर शरीरातील उष्णता वाढवते. त्याचा फायदा होतो.
पपई हे फळ त्वचेसाठी फार चांगले असते. आहारात पपई असावी. पाळी सुरळीत येण्यासाठी आणि शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी पपईचा फायदा होतो.
अननस हे फळ महिलांनी खावे. हार्मोन्ससाठी ते चांगले असते आणि त्यातील ब्रोमेलाईन पाळीसाठी फायद्याचे ठरते.
आहारात मेथीचे दाणे असावेत. मेथीचे दाणे पोट साफ करते. तसेच पाळी नियमित करण्यासाठी मदत करते. त्यातील काही घटक पाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
आलं फक्त सर्दी खोकल्यावरच नाही इतरही त्रासांवर उपयुक्त आहे. आल्यातील जीवनसत्त्व 'सी' आणि मॅग्नेशियम पाळी सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.