उपासाला करा या खास रेसिपी. काही मिनिटांचे काम. चव एकदम भारी.
उपासाला काय करायचे काय नाही असा प्रश्न कायम असतोच. कधी बराच पसारा मांडून काही करायचा कंटाळा आला असेल तर झटपट करता येणारे पदार्थही असतात.
साबुदाणा खिचडी आणि वडा जेवढा मस्त लागतो तेवढाच दह्यातला साबुदाणाही भारी लागतो. ताकात भिजवायचा आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची. फार चविष्ट लागतो.
बटाट्याची भाजी करायला अगदीच सोपी असते. बटाटा परतायचा आणि जिरं, हिरवी मिरचीची फोडणी लावायची. ही भाजी फार मस्त लागते.
रताळ्याचे काप करता येतात आणि रताळ्याची भाजीही करता येते. भाजी करायला फार वेळ लागत नाही. झटपट होते.
राजगिऱ्याचा लाडू उपासाला आवडीने खाल्ला जातो. दुधात हा लाडू भिजवायचा. हे कॉम्बिनेशन एकदम मस्त लागते.
पौष्टिक आणि पोटभरीचे खायचे असेल तर मस्त पर्याय म्हणजे फळांचे सॅलेड. विविध आवडत्या फळांचे काप एकत्र करा त्यावर मीठ घाला आणि खा.
वरीचा भात जसा केला जातो तसाच त्याचा उपमाही करता येतो. पाणी कमी घाला आणि मस्त भरपूर हिरवी मिरची घाला. चवीला छान लागतो.