पोटासाठी फायद्याची योगासने नक्की करा. गॅस आणि अपचन होणार नाही.
गॅसेसचा त्रास अनेकांना सारखा सतावतो. काही खाल्ले किंवा प्रवास केला की लगेच पोट डब्ब होतेच. त्यामुळे बेचैन व्हायला होते.
औषधाने तात्पुरता आराम मिळतो. मात्र काही अशी योगासने आहेत जी अगदी सोपी आहेत आणि तुम्हाला या त्रासातून कायमसाठी मुक्त करतील.
ही ३ आसने नियमित करा. त्यासाठी फार कष्ट घ्यायचे नाहीत. अगदी साधी आणि सोपी आहेत. दिवसातली १० मिनिटे या आसनांसाठी द्या आणि आराम मिळवा.
पवनमुक्तासन हे आसन अगदी सोपे आहे. पाय गुडघ्यात पकडून पोटाच्या दिशेने ओढायचे. या आसनामुळे अपचनाचा त्रास टाळता येतो.
मसकरासन केल्यामुळे पोटावर ताण येतो. आणि त्यामुळे पचनक्रिया छान होते. शिवाय हे आसन करायला अगदीच सोपे आहे.
शलभासन करणे एकंदरीत सगळ्याच पोटाच्या समस्यांवर प्रभावी आहे. गॅसेसचा त्रास कमी होतो आणि पचन आणखी छान होते.