झोपेत असताना शरीरात होत असतात 'हे' चमत्कारीक बदल..

आपण झोपेत असताना आपल्या शरीरात किती वेगवेगळे प्रकारचे बदल होत असतात पाहा..

जेव्हा आपण गाढ झोपेत असतो, तेव्हा मेंदू हातापायांच्या स्नायूंना तात्पुरतं पॅरालाईज करतो. यामुळे स्वप्नातल्या हालचाली आपण प्रत्यक्षात करत नाही.

झाेपेत असताना जेव्हा आपला श्वासोच्छवास चालू असतो, तेव्हा हळूहळू शरीरातली पाण्याची पातळीही कमी होत असते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून झोपेतून उठताच थोडे पाणी प्यायला हवे.

आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपला मेंदूही आपोआप डिटॉक्स होत असतो. 

जेव्हा आपण गाढ झाेपेत असताे तेव्हा आपली एखाद्या पदार्थाचा वास घेण्याची क्षमता पुर्णपणे कमी झालेली असते.

झोपेत असताना काही वेळा आपले स्नायू खूप वेगात रिलॅक्स होतात. त्यावेळी मेंदूला वाटतं की आपण पडत आहोत आणि त्यामुळे स्वत:ला वाचविण्यासाठी आपण पटकन हालचाल करतो आणि आपल्याला एक झटका लागतो.

आपण झोपेत असतानाही आपल्या डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल सुरू असते. पण आपण काहीही पाहू शकत नाही. 

Click Here