पहिला दिवाळसण एकदम दणक्यात करायचा असेल तर बायकोला काही खास गिफ्ट नक्की द्या..
कारण पहिला दिवाळसण दोघांच्याही कायम लक्षात असतो.. म्हणून त्या प्रसंगाचं गिफ्टही अगदी वेगळं, स्पेशल असायला हवं.
लग्नानंतरची पहिलीच दिवाळी असेल तर बायकोला एखादा छानसा दागिना गिफ्ट म्हणून द्या..
त्यातल्या त्यात अंगठी, कानातले, नेकलेस असे सोन्याचे दागिने देऊ शकलात तर आणखी उत्तम.
साडी हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे एखादी छानशी साडी सरप्राईज म्हणूनही तुम्ही बायकोला देऊ शकता.
पहिल्या दिवाळसणाचं गिफ्ट म्हणून तुम्ही बायकोला टु व्हिलर गाडी देण्याचा विचारही करू शकता.
बायकोला घेऊन दोन दिवस कुठेतरी फिरायला जा.. तिला हे सरप्राईज ट्रिपचं गिफ्टही खूप आवडेल.