रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत आरोग्यासाठी गुणकारी 'गवती चहा'...
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, यामुळे पोटदुखी,बद्धकोष्ठता,अतिसार आणि सूज यासारख्या समस्या टाळता येतात.
वजन कमी करण्यास मदत गवती चहा शरीरातील चयापचय क्रिया वाढवतो, ज्यामुळे चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहते.हे शरीराला सक्रिय ठेवण्यासही मदत करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गवती चहाचे नियमित सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे शरीर रोगांपासून संरक्षित राहते आणि इम्युनिटी वाढते.
लोह आणि कॅल्शियमचा पुरवठा गवती चहा आणि लिंबू एकत्र घेतल्याने शरीरातील अशक्तपणा कमी होतो. यातील लोह आणि कॅल्शियममुळे रक्ताची कमतरता कमी होते आणि शरीर ताजेतवाने राहते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर गवती चहामध्ये अ आणि सी जीवनसत्त्वे असतात, जे त्वचा आणि केसांना पोषण देतात. यामुळे केसांची वाढ होते आणि त्वचेला ताजेपणा मिळतो.
अँटी-बॅक्टेरियल , अँटी-फंगल गुणधर्म गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. पावसाळ्यात याचे सेवन विशेष फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल कमी करणे गवती चहा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
पचनासाठी उत्तम गवती चहा अपचनाचा त्रास दूर करतो. पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांवर हा एक उत्तम उपाय आहे.
पित्ताच्या त्रासावर उपाय पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी गवती चहा फायदेशीर आहे. यामुळे पित्त नियंत्रणात राहते आणि आराम मिळतो.
त्वचा आणि सर्दी-खोकल्यावर उपायसर्दी-खोकल्यावरही याचे सेवन प्रभावी ठरते.