काकडीची कोशिंबीर करायची ही पद्धत एकदा नक्की पाहा. चव लागते वेगळीच.
काकडीची कोशिंबीर घरोघरी केली जाते. लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी ती खाणे जरा कठीण जाऊ शकते. त्यांच्यासाठी खास या पद्धतीने करा.
काकडी सोलायची आणि मग मस्त किसून घ्यायची. इतरही पदार्थ जसे की गाजर, बीट किसून घ्यायचे. चावायला सोपे जाते.
हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. कोथिंबीर चिरुन घ्यायची.
एका खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. त्यात मीठ घालायचे आणि फेटायचे.
एका फोडणीपात्रात तेल घ्यायचे. त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता घालून फोडणी तयार करायची. हळद घालायचे आणि हिंगही घालायचे.
तयार फोडणी कोशिंबीरीवर ओतायची. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करुन पाहा.