ग्रीन टी अतिशय आरोग्यदायी असला तरीही त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा तो योग्यवेळी प्यायला जातो.
असं म्हणतात की ग्रीन टी पिण्याची सगळ्यात योग्य वेळ म्हणजे जेवणाच्या आधी किंवा नंतर एक तासाने...
जर तो सकाळी उपाशीपोटी घेतला तर तर त्यात असणाऱ्या टॅनिनमुळे ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
तसेच जर तो तुम्ही रात्री उशिरा घेतला तर त्याच्यात असणाऱ्या कॅफिनमुळे तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते.
वर्कआऊट करण्याच्या अर्धा तास आधी ग्रीन टी पिणेही फायदेशीर मानले जाते. कारण त्यामुळे लवकर फॅट बर्न होण्यास मदत होते.
ग्रीन टी पिण्यापुर्वी या काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तो नक्कीच आरोग्यदायी ठरू शकतो.