सेलिब्रिटींना कोणते पदार्थ खायला आवडतात याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते..
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर मुस्तफा अहमद यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काही सेलिब्रिटींच्या आवडत्या पदार्थांविषयी सांगितले होते.
त्यापैकी यामी गौतम हिला म्हणे चहा प्रचंड आवडतो आणि तिचं नेहमीच घरच्या जेवणाला प्राधान्य असतं.
हृतिक रोशन याला तूप लावलेल्या गरमागरम पोळ्या खायला प्रचंड आवडतं. एकावेळी अगदी १० ते १२ पोळ्या तो खातो असं मुस्तफा सांगतात.
विकी कौशल हा पक्का पंजाबी असून तो प्रचंड फूडी आहे. त्याला सगळेच पदार्थ आवडतात आणि तो ते चांगल्या प्रकारे पचवू शकतो.
रणवीर सिंगला नटेला खायला अतिशय आवडतं. शिवाय त्याला सिंधी फूड अतिशय आवडतं. त्यातही सिंधी कढी आणि भात हा त्याचा आवडीचा पदार्थ आहे.
बेबोला साधी खिचडी खायला खूप आवडतं. तिने अनेकदा मुलाखतींमधूनही सांगितलं आहे की आठवड्यातून २ ते ३ वेळा तिला खिचडी हवीच असते.