दीपिकाप्रमाणेच 'या' सेलिब्रिटींनाही झाला होता डिप्रेशनचा त्रास 

दीपिका पदुकोनप्रमाणेच इतरही अनेक सेलिब्रिटी या त्रासातून गेलेले आहेत.

शाहरुख खाननेही एका मुलाखतीत त्याला झालेल्या मानसिक त्रासाविषयी सांगितलं होतं. त्याला डिप्रेशन आलं होतं आणि खूप एकाकी झाल्यासारखं वाटत होतं.

अनुष्का शर्माला एन्झायटीचा खूप त्रास होता आणि तिने बऱ्याच ट्रिटमेंट घेऊन तो त्रास नियंत्रणात आणला.

हृतिक रोशन कितीही फिट दिसत असला तरी काही वर्षांपुर्वी तो मनाने खचला होता. त्याला डिप्रेशन तर आलं होतंच पण मनात सतत विचारांचा गोंधळ आणि कन्फ्युजन होतं.

एका मुलाखतीत इलियाना डिक्रुझने सांगितलं होतं की काही वर्षांपुवी ती body dysmorphic disorder, एन्झायटी आणि डिप्रेशनमुळे प्रचंड खचलेली होती.

अभिनेत्री आलिया भट हिलाही जवळपास ६ महिने खूप मानसिक त्रास झाल्याचं तिने सांगितलं होतं. जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलून, डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिचा हा त्रास कमी झाला.

Click Here