सध्या हृदयविकाराचं, हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे थोडी विशेष काळजी घेणंच योग्य..
यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आहारातलं तेल. हृदयाचं आरोग्य जपायचं तर तेलाची निवड योग्य व्हायला हवी.
अनेक एक्सपर्टच्या मते ऑलिव्ह ऑईल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.
ऑलिव्ह ऑईलप्रमाणेच मोहरीचं तेलही हृदयासाठी चांगलं मानलं गेलं आहे. कारण त्यामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ असतात.
मोहरीचं तेल बॅड कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी मदत करतं.
शेंगदाण्याच्या तेलामध्येही व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.
अळशीचं तेलही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण त्यात ओमेगा ३ फॅटी ॲसिड असतात.