रोज सकाळी २ ते ४ भिजवलेले अक्रोड खाणे तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर असते.
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
अक्रोडमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करतात.
अक्रोड नियमितपणे खाल्ल्यास एकाग्रताही वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही अक्रोड रोज खायला द्यावे.
अक्रोड खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्ताभिसरणाचे काम आणखी उत्तम होते.
पचन क्रिया सुधारण्यासाठीही अक्रोड अतिशय उपयुक्त ठरतात.
शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढविण्यासाठी अक्रोड उपयुक्त ठरतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही ते फायदेशीर आहेत.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त ठरतात.