सारखी भूक लागत असेल काही तरी मस्त खावेसे वाटत असेल तर खा ज्वारीच्या लाह्या.
अगदी पोटभर जेवल्यावरही काम करताना किंवा एखादा सिनेमा बघताना काहीतरी सटरफटर खायची सवय अनेकांना असते. एकदा खायला लागल्यावर पाकिट संपते पण जिभेचे चोचले भागत नाहीत.
असे काही खावेसे वाटल्यावर प्रत्येक वेळी तोंडावर ताबा ठेवणे कठीण जाते. त्यामुळे काही पौष्टिक पदार्थ अशावेळी नक्की खा. पोटभर खा.
जसे की ज्वारीच्या लाह्या. फार पौष्टिक असतात. कितीही खा त्याचा काही त्रास किंवा दुष्परिणाम होणार नाही. एकदम हलका असा पदार्थ आहे.
ज्वारीच्या लाह्या नुसत्या भाजायच्या. भाजलेला कडीपत्ता, मीठ आणि तिखट त्याला लावायचे. भाजलेले शेंगदाणे घालायचे. चवीला एकदम मस्त लागते.
या लाह्या कितीही खाल्या तरी वजन वाढत नाही. त्यात फायबर भरपूर असते त्यामुळे त्या पटकन पचतात. शरीराला ऊर्जा मिळते.
पचनक्रियेवर ताण येत नाही. जरा जास्त प्रमाणात खाल्यामुळे पोट डब्ब होत नाही. कारण या लाह्या पचायला अगदीच हलक्या असतात.