हिरव्या रंगाच्या आकाराने लहान असणाऱ्या भोपळ्याच्या बिया महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जबरदस्त फायदेशीर ठरतात.
ॲनिमियापासून ते हार्मोन्सच्या असंतुलनापर्यंत कित्येक त्रास त्यामुळे कमी होऊ शकतात.
भोपळ्याच्या बियांना आयर्नचे पॉवर हाऊस मानले जाते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असल्याने हार्मोन्स संतुलित राहतात. पीसीओडी, अनियमित पाळी असे त्रास कमी होतात.
या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी ते फायदेशीर ठरते.
भोपळ्याच्या बियांमध्ये असणारे काही घटक शांत झोप येण्यासाठीही मदत करतात. त्वचेचे साैंदर्य खुलविण्यासाठीही भोपळ्याच्या बियांचा फायदा होतो.