गूळ आणि बडिशेप एकत्र खाण्याचे जबरदस्त फायदे

गूळ आणि बडिशेप हे दोन्ही पौष्टिक पदार्थ एकत्र खाणं बघा तब्येतीसाठी किती फायदेशीर ठरतं.

जेवणानंतर गूळ आणि बडिशेप एकत्र करून खाण्याची सवय अनेकांना असते. 

डॉक्टर सुभाष गोयल सांगतात की गूळ हा पौष्टिक आहेच. गूळ खाल्ल्याने शरीरातल्या अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता भरून निघते.

पण जेव्हा गुळासोबत बडिशेप खातात तेव्हा शरीरातला सगळा थकवा पळून जातो. 

शिवाय गूळ आणि बडिशेप एकत्र करून खाल्ल्याने शरीराला मजबूती मिळते. अधिक उर्जा येते. 

ज्यांना पचनाचा त्रास असतो त्यांच्यासाठीही गूळ आणि बडिशेप एकत्र करून खाणे जास्त फायद्याचे ठरते. 

पोट गुबारल्यासारखं वाटत असेल, गॅसेस होत असतील तर गूळ आणि बडिशेप एकत्र करून खा.

Click Here