आपल्याला माहिती आहेच की आध्यात्मिकदृष्ट्या तर तुळशीला महत्त्व आहेच. पण आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अतिशय गुणकारी असते.
सकाळी उठून तोंड न धुताच जर तुम्ही तुळशीची ७ ते ८ पानं बारीक चावून खाल्ली तर त्यामुळे तब्येतीच्या कित्येक तक्रारी दूर होऊ शकतात.
रोज सकाळी नियमितपणे तुळशीची पानं चावून खा. यामुळे पचनाच्या कित्येक तक्रारी कमी होतील.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही तुळशीची पानं उपयुक्त ठरतात.
काही लोकांच्या तोंडाला नेहमीच खूप दुर्गंधी येते. हा त्रास कमी करण्यासाठीही तुळशीची पानं उपयोगी ठरतात.
मानसिक ताण किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठीही तुळशीच्या पानांची मदत होते.
सर्दी, खोकला, घसादुखी अशा त्रासावरही तुळशीची पानं बारीक चावून खाणं हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.