साखर न टाकता जर तुम्ही सलग महिनाभर चहा घेतला तर तुमच्या शरीरात पुढील बदल दिसू शकतात...
बिनसाखरेचा चहा घेतल्यास शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरी कमी होतात आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहाते. त्यामुळे मधुमेहींसाठी तर ही सवय खूपच फायदेशीर ठरणारी आहे.
बिनसाखरेचा चहा नियमितपणे घेतल्यास दात किडण्याचे प्रमाणही बरेच कमी होऊ शकते.
साखरेचे प्रमाण कमी केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीरच आहे.
साखर न घातलेल्या ग्रीन टी मध्ये किंवा ब्लॅक टीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सही चांगल्या प्रमाणात असतात.