बडिशेप घातलेलं पाणी रोज प्यायलं तर काय होतं?

बडिशेप घातलेलं पाणी रोज नियमितपणे पिण्याचे हे काही फायदे वाचाच.. 

यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात १ चमचा बडिशेप भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायचं.

यामुळे ब्लोटिंगचा त्रास कमी होतो. पोट हलकं वाटतं. 

शरीर थंड राहण्यास मदत होते आणि शरीरावरची सूज कमी होते.

ज्यांना नेहमीच अपचन, ॲसिडीटी, गॅसेस असा त्रास होतो, त्यांच्यासाठी बडिशेपेचं पाणी पिणं अतिशय फायदेशीर ठरतं. 

मासिक पाळीच्या काळातली पोटदुखी कमी करण्यासाठीही बडिशेपेचं पाणी उपयुक्त ठरतं. 

Click Here