मुलतानी माती त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरते. बघूया मुलतानी मातीचे त्वचेला काय काय फायदे होतात..
मुलतानी माती नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास व्हाईट हेड्स, ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते.
त्वचा खूप डल, रखरखीत झाली असेल तर ती पुन्हा मुलायम, कोमल करण्यासाठी मुलतानी मातीचा फायदा होतो.
टॅनिंग, डेड स्किन काढून टाकण्यासाठीही मुलतानी माती त्वचेला लावणे खूप फायदेशीर ठरते.
मुलतानी मातीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे त्वचेवरचे पिंपल्स कमी करण्यासाठीही ती फायदेशीर ठरते.
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मुलतानी मातीमध्ये थोडे ग्लिसरीन आणि गुलाबजल घालावे आणि मग ती चेहऱ्याला लावावी.
व्हिटॅमिन ई किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घालून मुलतानी माती त्वचेला लावल्यास हिवाळ्यात त्वचेला जास्त फायदा होतो.