तुपामध्ये जर दालचिनी घातली तर त्याचे कित्येक फायदे आहेत. ते नेमके कोणते ते पाहूया...
घरी तयार केलेल्या साजुक तुपाची चव आणि सुगंध काही वेगळाच असतो.. विकतच्या तुपाला घरच्या साजुक तुपाची सर नसतेच..
आता काही घरांमध्ये घरातल्या ज्येष्ठ महिला तूप तयार होत असताना त्यात थोडा दालचिनीचा तुकडाही घालतात.
दालचिनीमुळे आधीच सुगंधी असणाऱ्या तुपाला आणखी छान सुगंध येतो आणि शिवाय त्याची चवही खूप खुलते.
याशिवाय दालचिनीमध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टीफंंगल गुणधर्म तुपाची पौष्टिकता आणखी वाढवतात.
दालचिनीमुळे चयापचय क्रियाही अधिक चांगली होते. त्यामुळेच दालचिनी आणि तूप ही जोडी पचनक्रियेसाठी अधिक उत्तम ठरते.
थंडीच्या दिवसांत तर दालचिनी घातलेलं तूप खाणं शरीर उबदार ठेवण्यास जास्त उपयुक्त ठरतं.