सप्लिमेंट्स घेण्याआधी लक्षात ठेवा या ६ गोष्टी 

कोणत्याही प्रकारच्या सप्लिमेंट्स घेण्याआधी काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारणे जाणून घ्या.

चांगल्या आरोग्यासाठी तसेच शरीरातील एखाद्या पोषकाची कमतरता मिटवण्यासाठी अनेक जण सप्लिमेंट्स घेतात. 

व्हिटॅमिन्स तसेच इतरही काही गोष्टींसाठी सप्लिमेंट्स घेता येतात. केसांसाठी त्वचेसाठी अनेक जण काही ना काही सप्लिमेंट्स वापरतात. 

सप्लिमेंट्स आणि औषध दोन्ही जरी वेगळ्या गोष्टी असल्या तरी शेवटी त्या गोळ्याच. त्यामुळे सप्लिमेंट्स घेण्याआधी काळजी घेणे फार गरजेचे असते. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही गोळी घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा. डॉक्टरांशी संवाद साधणे फार महत्त्वाचे असते. अगदी प्रोटीन पावडरही तज्ज्ञांना विचारुनच घ्यावी. 

सप्लिमेंट्स एकदा घ्यायची सवय लागली की माणसे त्या सवयीच्या आहारी जातात. त्यामुळे शरीराला त्याचा त्रास होतो. अति सप्लिमेंट्स वापरणे अपायकारक ठरते.

सप्लिमेंट्स घेताना प्रसिद्ध आणि सरकारमान्य अशा नामवंत कंपनीच्याच विकत घ्यायच्या. स्वस्तात मिळतात म्हणून कोणत्याही सप्लिमेंट्स वापरु नयेत.

योग्य प्रमाणात आणि योग्य वेळीच सप्लिमेंट्स घ्या. एक वेळ ठरवा आणि त्याच वेळी सप्लिमेंट्स घ्या. उठसूट कधीही खाऊ नका. 

सप्लिमेंट्स घेण्याआधी शक्यतो काहीतरी खा. पोटाला आधार मिळतो. उपाशी असताना सप्लिमेंट्स घेणे शरीरासठी उष्ण ठरु शकते. 

Click Here