मंगळसूत्र ब्रेसलेट प्रकारात हल्ली खूप नवनवे प्रकार पाहायला मिळत आहेत...
मंगळसूत्र ब्रेसलेट हे हल्लीच्या तरुण मुलींमध्ये प्रचंड ट्रेण्डी आहेत.
रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसमध्ये घालण्यासाठी ते अतिशय आकर्षक आणि स्टायलिश दिसतात.
अगदी ५ ते ६ ग्रॅमपासून मंगळसूत्र ब्रेसलेट मिळत आहेत.
त्यामुळे कमीतकमी किमतीत मस्त दागिना घ्यायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.
मंगळसूत्र ब्रेसलेट जसे साडीवर चांगले दिसतात तसेच ते वेस्टर्न कपड्यांवरही उठून दिसतात.
असे नाजुक डिझाईन असणारे मंगळसूत्र ब्रेसलेट जर तुमच्या हातात असेल तर हाताचे साैंदर्यही नक्कीच खुलून दिसते.