फूड पॉयझनिंग टाळा, पावसाळ्यात खा ६ पदार्थ

पावसाळ्यात होणारे पचनाचे त्रास टाळा. आहारात असू द्या हे काही पदार्थ. 

अन्नातून विष बाधा म्हणजेचफूड पॉयझनिंग पावसाळ्यात अनेकांना होते. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ तसेच इतरही कारणांमुळे हा त्रास होतो. 

पचनाचे अनेक त्रास होतात. पोट खराब असल्यावर काय खावे काय नाही यावर बंधनं येतात. अपचन किंवा फूड पॉयझनिंग झाले असेल तर आहारात हे पदार्थ असणे फायद्याचे ठरते. 

आहारात दही असावे. घरचे ताजे दही पोटाला थंडावा देते तसेच पचनासाठी चांगले असते.

लिंबू पाणी प्या. लिंबात अण्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. शरीराला डायड्रेटेड ठेवण्यासाठी हे फार फायद्याचे ठरते. 

केळे खाणे पोटासाठी चांगले असते. त्यात फायबर असतात. पचनासाठी केळे एकदम हलके असते. 

आल्याचा रस थोडा थोडा पित राहा. पचनासाठी ते फायद्याचे असते. त्यात अनेक गुणधर्म असतात. जी पोटासाठी उपयुक्त ठरतात. 

सफरचंद हे फळ आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. गट हेल्थसाठी सफरचंद एकदम मस्त काम करते. त्यामुळे आहारात सफरचंद असावे. 

पचनाचा त्रास होत असताना पातळ अशी डाळ आहारात असावी. त्यात प्रोटीन त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच पोट भरलेले राहते आणि त्रास होत नाही. 

हिंग घालून ताक प्या. ताकात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ताक पचायला हलके असते. पोटाला आधार आणि शरीराला ऊर्जा मिळते. पचनही सुरळीत होते. 

Click Here