हे ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, कारण...

हे पदार्थ तुम्ही नक्कीच आवडीने खात असाल, मात्र ते खाणे आजच बंद करा. कारण....

काही पदार्थ असे असतात जे फार लोकप्रिय असतात, प्रसिद्ध असतात. त्याच्या अनेक नावाजलेल्या कंपनी असतात मात्र ते पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. 

असे पदार्थ तुम्हीही सारखे खात असाल तर वेळीच खाणे टाळा. चवीला जेवढे छान आरोग्यासाठी तेवढेच हानिकारक असतात. 

डोनट्स हा विदेशी पदार्थ आहे. मात्र भारतात त्याला भरपूर मागणी आहे. डोनट्स करताना त्यात अतिप्रमाणात साखर वापरली जाते. कोणत्याच प्रकारे तो आरोग्यासाठी चांगला नाही. 

बर्गर आजकाल तरुणवर्गाला फार आवडणारा पदार्थ. तो चवीला जरी छान लागला त्यात भाज्या असल्या तरी तो तयार करतानाची पद्धत आरोग्यदायी नाही. बर्गर खाणे पचनासाठी चांगले नाही. 

पिझ्झा म्हणजे मैद्याचा गोळाच असतो. त्यावर वापरल्या जाणाऱ्या भज्याही ताज्या आणि चांगल्या नसतात. त्यामुळे असे पदार्थ घरी तयार करुन खा. 

कोल्डड्रिंक्स पाण्यासारखे पिणारी लोकंही आहेत. त्यात गॅस असतो आणि फक्त साखर असते. साखरही शुद्ध नसून रासायनिक असते. त्यामुळे अशी थंड पेये पिणे टाळा.

भारतात देसी चायनिज फार लोकप्रिय आहे. त्यात वापरले जाणारे अजिनोमोटो आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे विकतचे चायनिज खाणे टाळा. घरी मस्त करता येते. 

Click Here