लग्न होण्यापुर्वी आपल्या होणाऱ्या पार्टनरच्या बाबतीत या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या..
तुम्ही अरेंज मॅरेज करणार असो किंवा मग लव्ह मॅरेज. तुमच्या पार्टनरशी लग्नापुर्वी तुम्ही काही गोष्टी बोलायलाच पाहिजेत.
लग्न करण्याचा निर्णय तुमच्या पार्टनरने खरंच त्याच्या मनाने घेतला आहे ना कोणाच्या दबावाखाली येऊन तो लग्न करत नाहीये ना
लग्न झाल्यानंतर एक पती किंवा पत्नी म्हणून त्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत
लग्नानंतर तुमच्या पार्टनरचे करिअर प्लॅन कसे असणार आहेत
तुमच्या पार्टनरचे काही अफेअर होते का आणि ते कितपत सिरियस होते हे देखील विचारणं खूप गरजेचं आहे.
तुमच्या पार्टनरच्या कुटूंबामध्ये नेमकी कोणकोणत्या आजारांची हिस्ट्री आहे तुमच्या पार्टनरला काही आजार आहेत का?
या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या आणि मगच लग्नाचा निर्णय घ्या. कारण एकदा लग्न झाल्यानंतर पुन्हा रिव्हर्स येणं महाकठीण असतं.