ज्वारीची भाकरी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

ग्लुटेन फ्री मिलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीची भाकरी खाणं आरोग्यासाठी अतिशय पोषक असतं. 

ज्वारीमध्ये फायबर भरपूर असल्याने पचायला ती सोपी जाते. बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.

कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असल्याने ज्वारीची भाकरी वेटलॉस करण्यासाठी उत्तम मानली जाते. 

ज्यांना अपचनाचा नेहमीच त्रास होतो त्यांनी ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य द्यायला हवं.

ज्वारीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने ती हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते.

ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही ती उपयुक्त ठरते.

Click Here