रात्री झोपण्यापुर्वी सुंठेचं पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे
रात्री झाेपण्याच्या आधी जर तुम्ही नियमितपणे सुंठ घातलेलं पाणी प्यायलं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो पाहा..
सुंठेचं पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेले सगळे विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात आणि बॉडी डिटॉक्स होते.
ज्या लोकांना पचनाशी संबंधित वेगवेगळे त्रास नेहमीच होतात, त्यांच्यासाठीही सुंठ घातलेलं पाणी पिणं फायद्याचं ठरतं.
इम्युनिटी वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला, कफ असे त्रास कमी होतात.
ज्या लोकांना त्वचेशी संबंधित ॲलर्जीचा त्रास असतो, त्यांच्यासाठीही सुंठ घातलेलं पाणी पिणं फायद्याचं ठरतं.
हे पाणी तयार करण्यासाठी १ ग्लास पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात थोडी सुंठ पावडर घाला. पाणी ६ ते ७ मिनिटे चांगलं उकळू द्या आणि त्यानंतर ते गाळून घ्या आणि गरम असतानाच प्या.