सगळीकडे आलिया भटच्या कान्स लूकचीच चर्चा ..

सगळीकडे आलियाच्या रेड कार्पेेट लूकची चर्चा चांगलीच रंगली. पाहा कशी दिसते आणि नक्की काय झाले. 

आलिया भटने यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात तिच्या सुंदर आणि राजेशाही अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा लूक साधा पण अतिशय आकर्षक दिसत होता.

तिने पीच रंगाचा खास डिझायनर गाऊन परिधान केला होता. गाऊनवरील हलकं काम आणि लांब ओढणीसारखी जोड तिच्या रूपात अधिक भर घालत होती.

आलियाने दागिनेही अतिशय मर्यादित आणि सुंदर निवडले होते. मोती आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमुळे तिचा संपूर्ण अंदाज उठून दिसत होता.

तिचा मेकअप अतिशय हलका ठेवण्यात आला होता. नैसर्गिक चमक आणि साधी केशरचना यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसलं.

काही गोष्टींसाठी आलिया चांगलीच ट्रोलही होत आहे. मिडियाने तिला पाहिलं नाही , ओळखलं नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

दुसरीकडे प्रत्येक गोष्टीवरुन ट्रोल करण्याची गरज नाही असं म्हणणारेही अनेक जण आहेत. दोन्ही बाजूंनी आलियाचा लूक मात्र चर्चेत आलाच. 

Click Here