आलिया भटने बाळंतपणानंतर खूपच कमी दिवसांत कमालीचा वेटलॉस केला.
गरोदरपणात, बाळंतपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आलिया नेमकं काय करत होती हा प्रश्न तिच्या कित्येक चाहत्यांना नेहमीच पडतो.
आलिया भटचे फिटनेस ट्रेनर सोहराब खुशरुशाही सांगतात की आलियाने कोणतीही सर्जरी न करता बाळंतपणानंतर नॅचरल पद्धतीने वेटलॉस केला आहे.
गरोदरपणात ती नियमितपणे व्यायाम करायची. त्याचाच परिणाम म्हणून बाळंतपणानंतरही तिचं वजन लवकर कमी होऊ शकलं.
सोहराब सांगतात की आलिया तिचं वर्कआऊट खूप सिरिअसली करते. १२ तासांचं शुटिंग केलं तरी ती पहाटे लवकर उठून वर्कआऊट करतेच.
वॉकिंग, पिलेट्स, योगा, कार्डिओ असा व्यायाम करण्यासोबत ती आहारावरही लक्ष देते. यामुळेच ती बाळंतपणानंतर लवकर वजन कमी करू शकली.