सैयाराचा अहान आणि सुहाना खानचा व्हिडिओ व्हायरल 

अहान आणि सुहानाच्या रिलेशनशिपच्या चर्चा. नक्की काय आहे प्रकार. 

सध्या सैयारा हा चित्रपट जोरदार सुरु आहे. त्यातील मुख्य अभिनेता मुलींचा नवा क्रश झाला आहे. त्याचे चाहते वाढतंच चालले आहेत. 

अहान पांडे चित्रपटामुळे या चर्चेत होताच, मात्र आता एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरु झाली आहे. 

अहानचा एक फार जुना व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अहान पांडे एका मुलीसोबत दिसला. 

ती मुलगी दुसरी तिसरी कोण नसून गौरी आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आहे. त्यामुळे व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. 

त्यात दोघंही एकदम तरुण दिसत आहेत ते एकत्र फिरताना व्हडिओमध्ये दिसले. त्यांना एकत्र पाहून नेटकरी आपापले अंदाज लावायला लागले.

अहान हा अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. त्यामुळे अहान आणि सुहाना एकमेकांना आधीपासून ओळखत असतील किंवा फॅमिली फ्रेंड्स असतील असेही अनेक जण म्हणाले. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुहाना आणि अहान मिडियापासून लपताना दिसले. त्यामुळे चर्चेला जोर मिळाला. 

सध्या आहान आणि श्रुती चौहान यांच्या नात्याबद्दलही चर्चा जोरदार सुरु आहे. सैयारामुळे अहानसंबंधीच्या सगळ्याच चर्चा सोशल मिडियावर रंगताना दिसत आहेत.   

Click Here