दुपारी झोपलात तर दिवस खराब झालच म्हणून समजा. पाहा काय कारणं आहेत.
दुपारची झोपायची सवय अनेकांना असते. आरामासाठी दुपारी थोडावेळ पाठ टेकणे नक्कीच चांगले आहे. मात्र तासंतास झोपत असाल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
दुपारी भरपूर झोपल्यावर रात्री झोप लागत नाही. झोपेचे चक्र बिघडते. रात्रीची झोप शरीरासाठी फार गरजेची असते.
दुपारी झोपल्यावर डोकं जड होतं. आळस वाढतो आणि पुढचा दिवस फार उदास वाटायला लागतो.
पचनक्रियेवर परिणाम होतो. जेवल्यावर लगेच झोपल्यामुळे पचन सुरळीत होत नाही. त्यामुळे अपचन होते.
पित्ताचा त्रास वाढतो. दुपारची झोप शरीरातील पित्त वाढण्यास कारणीभूत ठरते.
मेटाबॉलिझम मंदावते. दुपारची झोप पचनावर चांगलाच परिणाम करते. अन्न पचायला अडथळा येतो आणि मेटाबॉलिझम चांगले असले तरी ते मंद होते.
मनाला आणि शरीराला सुस्ती जाणवते. दुपारी झोपल्यावर शरीराला जास्त थकवा जाणवतो. झोप पूर्ण झाली तरी उठायचे मन करत नाही.
त्यामुळे जर तुम्हीही दुपारी तासंतास झोपत असाल तर ती सवय वेळीच बदला. आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही.