तिखट पदार्थ खाताना घाम का येतो?

आपण हा अनुभव नेहमीच घेतो. पण त्यामागचं कारण मात्र आपल्याला माहिती नसतं..

तिखट पदार्थ चटकदार लागतात. त्यामुळे कधी कधी तोंडाला छान चव येण्यासाठी आपण आवर्जून थोडे चटपटीत, तिखट पदार्थ खातो.

पण तिखट पदार्थ खाण्याची सवय नसली तर मग मात्र ते खाताना आपण अगदी घामाघूम होऊन जातो. असं नेमकं का होतं ते पाहूया.. 

मिरचीमध्ये कॅप्साईसिन नावाचा एक घटक असतो. त्याच्यामुळेच मिरचीला तिखटपणा असतो. 

जेव्हा तिखटामधल्या कॅप्साईसिनचा तिखटपणा जिभेला जाणवतो तेव्हा जिभेवरचे गरमपणा आणि तिखटपणा ओळखणारे काही पॉईंट्स ॲक्टीव्ह होतात.

ते आपल्या नर्व्हस सिस्टिमला शरीरात जळजळ होत असल्याची सूचना करतात. त्यामुळे मग गरम झालेल्या शरीराला थंड करण्यासाठी स्वेट ग्लँड्स ॲक्टीव्ह होतात आणि आपले शरीर घाम स्त्रवू लागते.

घाम आल्यानंतर मग आपल्याला थोडे शांत आणि जिभेला तिखटपणा कमी झाल्यासारखे जाणवते. 

Click Here