तणावमुक्त आणि निरोगी आयुष्यासाठी गवतावर चालायला विसरू नका...
गवतावर चालण्याचे आरोग्यदायी फायदे नैसर्गिक जीवनशैलीकडे एक पाऊल
नैसर्गिक मसाज गवतावर चालल्याने पायाच्या तळव्यांवर नैसर्गिक मसाज होतो, जे रक्ताभिसरण सुधारते.
डोळ्यांचे आरोग्य सकाळच्या वेळेस हिरव्या गवताकडे पाहिल्याने डोळ्यांना विश्रांती मिळते व दृष्टी सुधारते.
मानसिक शांतता गवतावर चालणे मनःशांती वाढवते, तणाव कमी करते आणि मानसिक आरोग्यास पोषक ठरते.
ऊर्जा वाढवते थंड गवतावर चालल्याने शरीराला थेट ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साही वाटते.
अक्युप्रेशरचा फायदा पायांच्या तळव्यांवरचे बिंदू दाबले जातात, जे विविध अंतर्गत अवयवांवर सकारात्मक परिणाम करतात.
हृदयासाठी फायदेशीर गवतावर चालल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहते.
मधुमेह नियंत्रणात नियमित चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहतो, मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त.
निसर्गाशी नाते गवतावर चालताना आपण निसर्गाच्या जवळ जातो,जे मानसिक आरोग्यास अधिक पोषक ठरते.
नैसर्गिक ध्यान गवतावर चालणे म्हणजे एक प्रकारचे ध्यानच;शरीर व मन यांची उत्तम जुळवाजुळव.