जाणून घ्या... डॉक्टर काय सांगतात ?
काही महिलांचं असं मत असतं की, टाइट जीन्स घातल्यानं प्रजनन क्षमतेचं नुकसान होतं. हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.
गर्भधारणेवर थेट परिणाम होत नाहीटाइट जीन्स घातल्यामुळे महिलांची प्रजनन क्षमता कमी होत नाही, असं डॉक्टरांचं स्पष्ट मत आहे.
रिप्रोडक्टिव हेल्थवर परिणाम होऊ शकतो नेहमी टाइट कपडे वापरल्यास एकंदर प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
व्हजायनल इन्फेक्शनचा धोका वाढतो.टाइट जीन्समुळे घाम धरतो आणि त्यामुळे यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल वेजिनोसिस होऊ शकते.
ओटीपोटात तापमान वाढत.टाइट जीन्समुळे पेल्विक भागात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते.
घर्षण व जळजळ जाणवते.अतिशय टाइट कपडे घातल्यास त्वचेला त्रास होतो, जळजळ,खाज आणि त्वचा सडण्याचा धोका असतो.
पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होऊ शकतो.टाइट अंडरविअर घालण्यामुळे पुरुषांच्या स्पर्म प्रोडक्शनवर परिणाम होतो,कारण उष्णता वाढते.
सतत वापर टाळाकधीतरी फॅशन म्हणून टाइट जीन्स वापरणं चालेल,पण दररोज वापरल्यास तोटाच होतो.
आरोग्य आणि फॅशन यामध्ये समतोल ठेवा.आरोग्याला प्राधान्य देत आरामदायक आणि सुती कपड्यांचा वापर करावा.
बॅक्टेरिया आणि फंगस वाढतातटाईट कपड्यांमुळे दमट वातावरण निर्माण होतं, जे बॅक्टेरियासाठी पोषक ठरतं.