रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, रक्ताचा सातत्यपूर्ण पुरवठा व्हावा यासाठी रक्तदान आवश्यक
रक्तदान कोण करू शकतं? रक्तदात्याचं वय 18 ते 65 दरम्यान असावं लागतं
रक्तदान कोण करू शकत नाही? हिपॅटायटीस-बी- सी, टीबी, एचआयव्ही, कर्करोग, कुष्ठरोग, हार्ट संबंधित आजार असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही
रक्तदान किती वेळा करू शकतो? पुरुष 3 महिन्यातून एकदा, तर महिला 4 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात.
रक्तदान करण्यापूर्वी काय खावे? रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, हिरव्या भाज्या खाऊ शकता
रक्तदान केल्यानंतर काय खावे? रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो
रक्तदानाचे फायदे काय? रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते.
गर्भवती महिलांनी रक्तदान करावे का? राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनुसार महिलेनं डिलिव्हरीनंतर १२ महिने रक्तदान करण्यास टाळावं.
कोरोनाचे रुग्ण रक्तदान करू शकतात का? कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते